मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने २६ वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ 'क्रीडा महोत्सव' गोंडवाना विदयापीठ, गडचिरोली येथे आयोजित केला गेला आहे.या महोत्सवासाठी आंतर विभागीय निवड चाचणी दि. २४ ते २५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत साई आयुर्वेद महाविद्यालय,सोलापूर येथे संपन्न झाली असून,सदर निवड चाचणीतून महाराष्ट्र राज्य आंतर विदयापीठ क्रीडा महोत्सव २०२४ साठी सावकार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज,सातारा च्या ४ खेळाडूंची निवड झाली आहे . निवड झालेले खेळाडू-अविष्कार चंद्रकांत शिंदे (खो-खो) ,अजय वसंत चौधरी (कबड्डी), शिवानी युवराज देवकर (खो- खो) ,निकिता भाऊसाहेब थोरात (कबड्डी) यांची “महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक” च्या संघामध्ये खेळाडू म्हणून निवड झालेली आहे. सदर या खेळाडूंचा समर्थ एज्युकेशन ट्रस्ट व सावकार होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज चे सेक्रेटरी श्री. निशांत गवळी,कॉलेजचे प्राचार्य डॉ.मनिष इनामदार,डॉ.रमा पाटुकले व डॉ.सौरभ खिरे यांनी सन्मान करून खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.