सावकार होमिओपॅथिक कॉलेज येथे दिनांक 31 12 2024 रोजी जिल्हा रुग्णालय सातारा जिल्हा एड्स नियंत्रण विभागा मार्फत रेड रिबन क्लब चे सावकार होमिओपॅथिक कॉलेज येथे स्थापन करण्यात आला जागतिक एड्स नियंत्रण दिनाचे औचित्य साधून कॉलेजमध्ये पोस्टर कॉम्पिटिशन तसेच एड्सजनजागृती पर व्याख्यान घेण्यात आले पोस्टर कॉम्पिटिशन मध्ये अतिशय उत्कृष्ट स्वतःच्या हाताने विद्यार्थ्यांनी पोस्टर्स बनवले होते भावी डॉक्टर या नात्याने प्रत्येक पोस्टर मध्ये एक वेगळे पण दिसून येत होते सखोल अभ्यास करून प्रत्येक पोस्टर बनवले गेले होते तसेच जिल्हा रुग्णालय सातारा येथील जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे जिल्हा पर्यवेक्षक पुंडलिक पाटील सर व आयसीटीसी समुपदेशक शुभांगी झांजुर्णे कदम यांनी विद्यार्थ्यांना एच आय व्ही एड्स, आणि सिपलीस, हिपॅटीटस याविषयी उत्कृष्ट पद्धतीने व्याख्यान दिले होमिओपॅथिक चे प्राचार्य डॉक्टर मनीष सर, तसेच रेड रिबन क्लब च्या नोडल ऑफिसर डॉक्टर पाटुकले मॅडम यांचे रेड रिबन क्लब स्थापन करण्यासाठी खूप चांगले सहकार्य लाभले